विभागीय आयुक्त घेणार मंगळवारी जिल्हा परिषदेचा आढावा बुधवारी अहमदनगर जिल्हा परिषदेचा आढावा
By Admin | Updated: January 18, 2015 01:45 IST2015-01-18T01:44:26+5:302015-01-18T01:45:03+5:30
विभागीय आयुक्त घेणार मंगळवारी जिल्हा परिषदेचा आढावा बुधवारी अहमदनगर जिल्हा परिषदेचा आढावा

विभागीय आयुक्त घेणार मंगळवारी जिल्हा परिषदेचा आढावा बुधवारी अहमदनगर जिल्हा परिषदेचा आढावा
नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या विकासकामांचा व योजनांचा आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी येत्या मंगळवारी (दि,२०) विभागीय आयुक्त एकनाथ डवले जिल्हा परिषदेत येणार असून, या आढावा बैठकीमुळे अनेक खातेप्रमुख आतापासूनच कामाला लागल्याचे चित्र आहे. रुजू झाल्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेचा यापूर्वीही विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्हा परिषदेत येऊन तब्बल चार तास आढावा घेतला असून, त्यात अनेक अधिकाऱ्यांना अपूर्ण माहितीमुळे धारेवर धरले होते. काही अधिकारी कामेच करीत नसल्याने त्यांना सेवा संपण्याआधीच सेवानिवृत्ती घेण्याच्या सूचना आयुक्त एकनाथ डवले यांनी दिल्या होत्या. त्यामुळे आता २० जानेवारीला जिल्हा परिषदेत येऊन पुन्हा विकासकामांची व योजनांची भौतिक व आर्थिक प्रगतीची माहिती व आढावा आयुक्त घेणार असल्याने जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांची विकासकामांची व योजनांची माहिती गोळा करण्यासाठी धावपळ उडाली आहे. जो तो खातेप्रमुख आयुक्तांच्या बैठकीसाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यासाठी त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांना ‘कामाला’ लावत असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्हा परिषदेत मंगळवारी (दि.२०) आढावा झाल्यानंतर बुधवारी (दि.२१) लगेचच अहमदनगर जिल्हा परिषदेत जाऊन विभागीय आयुक्त एकनाथ डवले आढावा घेणार आहेत. (प्रतिनिधी)