शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रभाग ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:34 IST

महापालिकेच्या हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३०चा सुमारे ९५ टक्के भाग सीसीटीव्ही कॅमेºयाच्या नजरेखाली आला आहे.

इंदिरानगर : महापालिकेच्या हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३०चा सुमारे ९५ टक्के भाग सीसीटीव्ही कॅमेºयाच्या नजरेखाली आला आहे. या प्रभागातील प्रत्येक चौकात युनिक ग्रुपच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने ३६ कॅमेºयांची प्रभागावर सूक्ष्म नजर असणार आहे. मंगळवारी वैभव कॉलनीतील सीसीटीव्ही कॅमेºयाचे उद्घाटन पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.इंदिरानगर परिसरात होणाºया घरफोड्या, सोनसाखळी चोरी आणि टवाळखोरीसह गुन्हेगारीस आळा बसण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेवक सतीश सोनवणे यांनी प्रभाग सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्यामुळे प्रभागातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात आल्याने ९५ टक्के प्रभाग सीसीटीव्हीच्या नजरेखाली आला आहे. अनेक वेळेस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाची मदत झाली आहे. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल जगताप, उपनिरीक्षक मोरे, अनिकेत सोनवणे, अनिल जाचक यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर शिरसाठ यांनी केले.यापूर्वी इंदिरानगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. परंतु अनेकदा तांत्रिक कारणामुळे अडचणी आल्याने नागरिकांकडून नाराजीदेखील व्यक्त करण्यात आली होती. आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे परिसरावर लक्ष राहणार असल्याने घरफोडी, सोनसाखळी चोरी यासारख्या गुन्हेगारीला आळा बसेल असे नागरिकांमधून बोलले जात आहे....या चौकात बसविले आहेत सीसीटीव्ही कॅमेरेभगवती चौक, राणेनगर चौफुली, लालबाग चौक, पांडव नगरी, कैलासनगर बसथांबा, कमोदनगर, चार्वाक चौक, राजीव टाउनशिप, नगरसेवक संपर्क कार्यालय परिसर याभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.महापालिका निवडणुकीत प्रभाग भयमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन टप्प्याटप्प्याने चौकाचौकात स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसून पूर्ण करीत आहे. सीसीटीव्ही कॅमेºयामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्यास मदतच झाली असून, गुन्हेगारीस आळा बसला आहे.- सतीश सोनवणे,  नगरसेवक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcctvसीसीटीव्हीNashikनाशिकPoliceपोलिस