कर्तृत्वातूनच होते ईश्वरप्राप्ती
By Admin | Updated: August 30, 2015 23:10 IST2015-08-30T23:06:35+5:302015-08-30T23:10:57+5:30
गुरुमित बग्गा : नामदेव महाराजांना अभिवादन

कर्तृत्वातूनच होते ईश्वरप्राप्ती
नाशिक : संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या प्रत्येक कार्यात पांडुरंग दिसत होता. त्यामुळे आपल्या कर्तृत्वातूनच ईश्वराची प्राप्ती होत असते. सृष्टीत प्रत्येक ठिकाणी ईश्वराचा वास आहे, असे प्रतिपादन उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सिडकोत आयोजित संत नामदेव महाराजांच्या ६६५व्या संजीवन समाधी सोहळ्यात बोलताना केले.
श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज सिडको मंडळाच्या वतीने नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन केले होते. सोहळ्यात शिंपी समाज हितवर्धक मंडळ आणि शिंपी समाज उत्कर्ष मंडळ यांचाही सहभाग होता. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव होते. यावेळी शिंपी समाजाचे अध्यक्ष विजय बिरारी, नाना निकुंभ, डी. व्ही. बिरारी, शांताराम सावळे, उद्धव जाधव, सचिन बोरसे, राजेश जगताप, प्रदीप जगताप, रत्नदीप जगताप, लता जाधव, रोहिणी बागुल आदि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागताध्यक्ष मुकुंद मांडगे व शेखर निकुंभ यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन नरेंद्र जगताप यांनी केले. दरम्यान, नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त लक्ष्मीधवल समाजमंदिरात प्रवचन, भजन, दिंडीसोहळा आदिंसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)