शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

जिल्ह्याची अंतिम मतदारयादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:15 AM

नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार पडताळणी मोहिमेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. ...

नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार पडताळणी मोहिमेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून १४,४२० नावे कमी करण्यात आल्यानंतर ४५ लाख ६४ हजार १२९ मतदारांची अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरी, देवळाली आणि मालेगाव मतदारसंघातून सर्वाधिक बोगस नावे कमी करण्यात आली आहेत. अंतिम मतदारयादी जाहीर करताना मतदारयादीतील संख्या वाढलेली दिसते असा आजवरचा अनुभव आहे. परंतु यंदा मोठ्या प्रमाणात नावे कमी झाली आहेत.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात निवडणूक शाखेच्यावतीने मतदारयादी अद्ययावतीकरण मोहीम राबविण्यात आली. वास्तविक, मे महिन्यात मतदार यादी अंतिम करणे अपेक्षित होते; परंतु कोरोनामुळे ते होऊ शकले नाही, शिवाय पडताळणीचा सप्टेंबरचा कार्यक्रमदेखील रद्द करावा लागला. त्यामुळे राज्य निवडणूक विभागाच्या वतीने राज्यात मतदार नोंदणीचा विशेष पुनर्रीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला. १७ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली होती. १ जानेवारी २०२१ च्या अर्हता दिनांकावर १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची नोंदणी मोहीम राबविल्यानंतर १५ डिसेंबर रोजी अंतिम मतदारी यादी जाहीर करण्यात आली.

जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने राबविण्यात आलेल्या पडताळणी मोहिमेत यापूर्वी ५६ हजार ९ मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत १४ हजार ४२० बोगस, दुबार मृत आढळलेल्या मतदरांची नावे वगळण्यात आल्याने वाढीव मतदरांची संख्या आता ४१ हजार ५८९ इतकी राहिली आहे. अंतिम मतदायादीत ४५ ला‌ख, ६४ हजार १२९ मतदरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मतदार पुनर्रीक्षण कार्यक्रमानुसार राबविण्यात आलेल्या मोहिमेत मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य यासह देवळाली मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात बोगस नावे समोर आली. मालेगाव मध्यमधून १६ हजार ९८८, मालेगाव बाह्य मतदारसंघातून १३,३४६, तर देवळाली मतदारसंघातून ४१५१ नावे वगळण्यात आली आहेत.

जिल्ह्याची अंतिम मतदारयादी नुसार

--इन्फो--

मतदारसंघनिहाय अंतिम मतदारयादी

मतदारसंघ पुरुष-स्त्री इतर एकूण वगळलेली मतदारसंख्या

नांदगाव १६४२७३ १४८९३९ ०१ ३१३२१३ २६०

मालेगाव(म) ५४८४५६ १४८२१४ ०६ ३०६६७६ १६९८८

मालेगाव(बा) १७७५८४ १५८९१६ ०३ ३३६५०३ १३३४६

बागलाण १४५३३९ १३२०२१ ०० २७७३६० ३२३

कळवण १३६९८९ १३१२४४ ०० २६८२३३ २३६

चांदवड १४८४५६ १३३६६५ ०० २८२१२१ २९८४

येवला १५५२४० १३९४७० ०४ २९४७१४ ३३०

सिन्नर १५६२६१ १४०६६८ ०० २९६९२९ ३०२०

निफाड १४३३९२ १३३९२५ ०२ २७७३१९ ३७३१

दिंडोरी १५८५९५ १४८३४९ ०३ ३०६९४८ ६४८५

नाशिक(पु) १८४८०५ १६९८५३ ०३ ३५४६६१ १५९१

नाशिक(म) १६४३५३ १५५६५७ ०५ ३२००१५ ९८५

नाशिक(प) २२१८५७ १८७३५२ ०० ४०९२०९ १८४३

देवळाली १३६१७३ १२४०८६ ०० २६०२५९ ४१५१

इगतपुरी १३३९०९ १२६०६० ०० २५९९६९ ५५७

एकूण २३८५६८३ २१७८४१९ २७ ४५,६४,१२९ १४४२०