गुणवंत क्रीडापटूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:19+5:302021-02-05T05:46:19+5:30
नाशिक : शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांनी ...

गुणवंत क्रीडापटूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार
नाशिक : शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल
प्रत्येक खेळाडूचे त्या खेळातील योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रुपये १० हजार रुपये असे आहे. त्यात गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी २०, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी ५ व दिव्यांग खेळाडू पुरस्कारासाठी ५ असे एकूण ३० अर्ज प्राप्त झालेले आहेत. या अर्जांची जिल्हा क्रीडा पुरस्कार छाननी समितीमार्फत छाननी करण्यात येऊन निवड करण्यात आली. तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवात शास्त्रीय गायनातील द्वितीय पारितोषिक प्राप्त कलाकार अथर्व ओंकार वैरागकर यांना प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय समारंभात गौरविण्यात आले. या प्रसंगी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, पोलीस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा पुरस्कार-२०२० चे वितरण २६ जानेवारी रोजी संपन्न
इन्फो
सात पुरस्कारार्थींचा सन्मान
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास मिळालेल्या ३० अर्जांपैकी त्यात थेट पुरस्कारासाठी ३ खेळाडू पात्र ठरले असून एक पुरूष खेळाडू, एक महिला खेळाडू, एक क्रीडा मार्गदर्शक व एक दिव्यांग खेळाडू असे एकूण सात पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले. त्यात गुणवंत खेळाडूंमध्ये धावपटू दुर्गा देवरे , राेइंगपटू भाग्यश्री चव्हाण, तलवारबाजीपटू ऋत्विक शिंदे,सॉफ्टबॉलपटू रणजीत शर्मा, दिव्यांग खेळाडू स्वयम पाटील, बेसबॉलपटू मंजुषा पगार आणि बेसबॉल मार्गदर्शक डॉ. सुरेखा दप्तरे यांना गौरविण्यात आले.
फोटो
२७दुर्गा देवरे
२७स्वयम पाटील