जिल्हा खो-खो प्रीमिअर लीगला प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST2021-02-13T04:15:42+5:302021-02-13T04:15:42+5:30

या प्रीमियर लीग खो-खो स्पर्धेत मुलांचे तीन व मुलींचे तीन असे सहा संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ साखळी ...

District Kho-Kho Premier League kicks off! | जिल्हा खो-खो प्रीमिअर लीगला प्रारंभ !

जिल्हा खो-खो प्रीमिअर लीगला प्रारंभ !

या प्रीमियर लीग खो-खो स्पर्धेत मुलांचे तीन व मुलींचे तीन असे सहा संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ साखळी सामन्यात प्रत्येकाशी दोन दोन सामने खेळणार असून, गुणतालिकेत प्रथम दोन असणाऱ्या संघांना अंतिम फेरीत झुंजावे लागत आहे. संघांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपयांचे रोख पारितोषिक व विजेत्या संघास आकर्षक चषक प्रदान केला जाणार आहे. संपूर्ण स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू, उत्कृष्ट संरक्षक खेळाडू व सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू यांची निवड करण्यात येणार आहे. त्यांना पाचशे रुपये रोख व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील उगवत्या खेळाडूंचा व राष्ट्रीय खेळाडूंचा खेळ नाशिककरांना बघावयास मिळत असल्याने क्रीडाप्रेमींनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले व सरचिटणीस उमेश आटवणे, प्रसिद्धीप्रमुख सचिन निरंतर यांनी केले आहे. पुढील दोन दिवस सकाळी आठ ते दहा व संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत हे सामने खेळविले जाणार आहेत.

Web Title: District Kho-Kho Premier League kicks off!