The district hospital will take swabs of all the staff | जिल्हा रुग्णालय सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेणार

जिल्हा रुग्णालय सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेणार

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक धोकादायक परिस्थितीत कार्यरत असणाºया डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञ आणि सर्व सहायक कर्मचाऱ्यांचे नियमितपणे स्वॅब घेण्याचे जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने मंगळवारी मान्य केले.
अत्यंत धोकादायक परिस्थितीत जिवावर उदार होऊन कार्यरत राहणाºया आरोग्य यंत्रणेतील या कर्मचाºयांची नियमित तपासणी होणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, अपुरे कर्मचारी, यंत्रणेतील त्रुटी आणि एकूणच कर्मचाºयांच्या सुरक्षेबाबत असलेल्या अनास्थेमुळे आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील कर्मचाºयांचा नियमितपणे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात येत नव्हती. मात्र, मंगळवारी सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाºयांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि प्रशासन अधिकाºयांची भेट घेऊन स्वॅब नियमितपणे घेतला जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मागणीला जिल्हा शल्य चिकित्सकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

Web Title: The district hospital will take swabs of all the staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.