जिल्ह्याला चार महिन्यांत जेमतेम पतपुरवठा

By Admin | Updated: May 6, 2017 01:55 IST2017-05-06T01:55:36+5:302017-05-06T01:55:45+5:30

नाशिक : चार महिन्यात जिल्ह्याला चारशे कोटी रुपयांचाच पतपुरवठा रिझर्व्ह बॅँकेकडून झाल्याने जिल्ह्यातील आर्थिक परिस्थिती संकटात सापडली आहे.

The district has been getting credit in four months | जिल्ह्याला चार महिन्यांत जेमतेम पतपुरवठा

जिल्ह्याला चार महिन्यांत जेमतेम पतपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नोटाबंदीनंतर स्टेट बॅँकेने रिझर्व्ह बॅँकेकडे सुमारे बाराशे कोटी रुपयांच्या चलनाची मागणी केलेली असताना चार महिन्यात जिल्ह्याला जेमतेम चारशे कोटी रुपयांचाच पतपुरवठा रिझर्व्ह बॅँकेकडून झाल्याने जिल्ह्यातील आर्थिक परिस्थिती संकटात सापडली आहे.
सध्या स्टेट बॅँकेकडे ९० कोटी तर खासगी बॅँकांकडे ३० कोटी अशी सुमारे १२० कोटी रुपयांची रक्कम शिल्लक असल्याने चलन तुटवडा जाणवणार नसल्याचे चित्र आहे. या उपलब्ध चलनातून ग्रामीण भागाला ३० टक्के तर शहरी भागाला ७० टक्के रक्कम वाटप करण्यात आली असली तरी, एटीएममध्ये नोटांचा खडखडाट कायम राहणार आहे. नाशिक शहरात स्टेट बॅँकेचे दोनशे एटीएम असून, त्यापैकी फक्त ७० एटीएममध्येच नोटांचा भरणा करण्यात आल्याचे तर १३० एटीएम बंद असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे. स्टेट बॅँकेने डिसेंबर २०१६ मध्ये रिझर्व्ह बॅँकेकडे १२८० कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यापैकी चार महिन्यांत रिझर्व्ह बॅँकेने ४५० कोटी रुपयांचा पुरवठा केला आहे.

Web Title: The district has been getting credit in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.