जिल्हा अजिक्यपद व्हॉंलीबॉल स्पर्धा २१ पासून
By Admin | Updated: November 16, 2014 01:07 IST2014-11-16T01:07:26+5:302014-11-16T01:07:55+5:30
जिल्हा अजिक्यपद व्हॉंलीबॉल स्पर्धा २१ पासून

जिल्हा अजिक्यपद व्हॉंलीबॉल स्पर्धा २१ पासून
नाशिक : जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या आणि गुरु दत्त स्पोर्ट््स क्लब यांच्या वतीने कळवण येथील एस. जी. पुब्लिक स्कूलच्या क्र ीडांगणावर शुक्रवारी (दि.२१) वरिष्ठ गटाच्या पुरु ष आणि महिलांच्या जिल्हा अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधून नाशिक जिल्'ाचे पुरु ष आणि महिला संघाची शिबिरासाठी निवड करण्यात येणार असून, शिबिरानंतर निवड झालेले पुरु ष आणि महिला संघ कोल्हापूर जिल्'ातील कुरुंदवाड यथे होणाऱ्या ४६व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेत नाशिक जिल्'ाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. कळवणसारख्या ग्रामीण भागात या स्पर्धा होत असल्यामुळे नाशिक जिल्हातील जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धत सहभाग घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा व्हॉलीबाल असोसिएशन आणि गुरु दत्त स्पोटर््््स क्लब यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धा शुक्रवारी (दि़ २१) रोजी दुपारी २ वाजता सुरू होतील़ ज्या संघाना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल अशा संघांनी दिनांक २० नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ६ पर्यंत मित्र विहार क्लब, मेहेर सिग्नल चौक येथे संपर्कसाधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़