मराठी कवी, लेखक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:48 IST2020-09-23T18:46:23+5:302020-09-23T18:48:34+5:30
नाशिक : मराठी कवी, लेखक संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश शेवाळे यांची निवड करण्यात आली आहे.

प्रकाश शेवाळे
ठळक मुद्देविष्णू थोरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
नाशिक : मराठी कवी, लेखक संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश शेवाळे यांची निवड करण्यात आली आहे. तर चांदवड येथील कवी, चित्रकार विष्णू थोरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सचिवपदी कवयित्री प्रतिभा खैरनार, सहसचिवपदी सोमदत्त मुंजवाडकर, कोषाध्यक्ष प्रकाशक प्रवीण जोंधळे, सहकोषाध्यक्ष डॉ. आशालता देवळीकर, संघटकपदी कवी प्रशांत केंदळे यांची निवड झाली आहे. केंद्रीय अध्यक्ष ज्येष्ठ लेखक दिनकर दाभाडे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.