शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

न्यायदान : जिल्हा न्यायालयाचे कामकाज दोन सत्रांत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 18:18 IST

सकाळी १० ते १ दुपारी २:३० ते पाच वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज चालले. न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासूनच येणाऱ्या वकिलांसह प्रकरणे दाखल करण्यासाठी येणा-या नागरिकांची थर्मल स्कॅनकरूनच प्रवेश दिला जात होता. तसेच शिपायांकडून सॅनिटायझरदेखील उपलब्ध करून दिले जात होते.

ठळक मुद्देवाहनतळातच प्रकरणे दाखल करण्याची सुविधाकोरोनाची खबरदारी घेत तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी

नाशिक : लॉकडाऊननंतर राज्यात ‘मिशन बिगेन अगेन’अंतर्गत शासनाने दैनंदिन व्यवहार हळुहळु पुर्वपदावर आणण्यास सुरूवात केली आहे. यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयदेखील पुर्ववत करण्यात आले आहे. सोमवारी (दि.८) सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत न्यायालयाचे कामकाज चालले. कोरोना आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासून तर थेट कोर्ट रूमपर्यंत विशेष खबरदारी घेण्यात आली होती.नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारपासून दुपारचे सत्रदेखील सुरू करण्यात आले. एकूण चार जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या कोर्टासह सिव्हील खटल्यांकरिता दोन आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे दोन असे एकूण आठ न्यायालयांमध्ये न्यायदानाचे कामकाज पार पडले. मंगळवारी (दि.९) यामध्ये दोन सत्र न्यायाधीशांचे कोर्ट अधिक सुरू करण्यात येतील. यामध्ये नियमित जामीन व अटकपुर्व जामिन अर्जांवर सुनावणी होईल. एकूण दहा न्यायालये मंगळवारपासून सुरू होतील, अशी माहिती न्यायालयीन सुत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयासह नाशिकरोड व मालेगाव न्यायालयात केवळ अती तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेतली जात आहेत. या सुनावणीदरम्यान केवळ कोर्टरूमध्ये न्यायाधीशांसमोर दोन्ही पक्षांचे दोन वकील आणि महत्त्वाचे साक्षीदार यांची उपस्थितीला प्राधान्य देण्यात येत आहे. प्रत्यक्षपणे पक्षकाराची उपस्थिती तुर्तास या कोरोनाच्या संक्रमणामुळे अनिवार्य नसल्याची सुचनाच उच्च न्यायालयाकडून देण्यात आली असून त्याचे पालन केले जात आहे. उर्वरित तालुका न्यायालयांमध्ये मात्र ५० ते ६० टक्के अधिकारी-कर्मचारीवर्गाच्या उपस्थितीत सर्वच प्रकारच्या खटल्यांचे नियमितपणे न्यायदानाचे कार्य सुरू झाले आहेत; मात्र कोरोना संक्रमणाबाबत घ्यावयाची खबरदारी पुर्णपणे घेण्याच्या सुचना प्रत्येक तालुकास्तरावरील न्यायालयांना जिल्ह्याचे प्रधान मुख्य सत्र न्यायाधीशांकडून देण्यात आल्या आहेत.सोमवारी दिवसभरात दोन्ही सत्रांमध्ये नाशिक जिल्हा न्यायालय व मालेगावमध्ये फौजदारी आणि अतितातडीच्या प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. सकाळी १० ते १ दुपारी २:३० ते पाच वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज चालले. न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासूनच येणाऱ्या वकिलांसह प्रकरणे दाखल करण्यासाठी येणा-या नागरिकांची थर्मल स्कॅनकरूनच प्रवेश दिला जात होता. तसेच शिपायांकडून सॅनिटायझरदेखील उपलब्ध करून दिले जात होते. वकिल चेंबर, बार रूम हे सुरू करण्याची अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. 

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस