कॉँग्रेसमध्ये जिल्हा-शहराध्यक्ष हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:01 AM2018-09-28T00:01:56+5:302018-09-28T00:02:08+5:30

District-City President Removal Campaign in Congress | कॉँग्रेसमध्ये जिल्हा-शहराध्यक्ष हटाव मोहीम

कॉँग्रेसमध्ये जिल्हा-शहराध्यक्ष हटाव मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्देसंघर्ष यात्रेपूर्वीच संघर्ष : नाराज गटाने घेतली बाळासाहेब थोरात यांची भेट

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले आता काँग्रेसमध्येही नेतृत्व बदलाची धार तीव्र झाली आहे. जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आणि शहराध्यक्ष शरद अहेर यांना हटविण्यासाठी दुसऱ्या गटाने कंबर कसली आहे. गुरुवारी (दि. २७) माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची इगतपुरीत बैठक घेऊन गाºहाणे मांडले आहेत. शहराध्यक्षांविषयी तक्रारी करण्यात आले असून, त्यामुळे यात्रेच्या आधीच संघर्ष उफाळला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्टÑीय पातळीवर सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे, परंतु कॉँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर अपेक्षित प्रतिसाद मिळत नसून त्याची प्रचिती नेत्यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहेत. ग्रामीण कॉँग्रेसमध्ये तर कोणतेही कार्यक्रम राबविले जात नसून ठप्प झालेल्या संघटनाविषयी अनेक आजी माजी आमदार आणि पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले आहेत. गेल्या वर्षभरापासून जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे हटाव मोहिमेला आता राष्टÑवादीतील संघटना बदलामुळे मोठे बळ मिळाले आहे. गुरुवारी (दि.२७) इगतपुरी येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात एका गटाने भेटून पानगव्हाणे हटाव, अशी मागणी करण्यात आली आहे. पानगव्हाणे सोडून अन्य कोणत्याही इच्छुकाला संधी द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर शुक्रवारी (दि. २८) विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखेपाटील यांची भेटदेखील घेणार आहेत.
शहराध्यक्ष बदलालादेखील आता गती मिळाली आहे. त्यासाठीदेखील सक्षम चेहेºयाचा शोध सुरू आहे. शहरातील गटबाजी नवी नाही. तथापि, राफेल विरोधी मोर्चाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नाराज असून, त्यातच त्यांच्याकडे तक्रारी गेल्याने आता गांधी जयंतीनिमित्ताने काढण्यात येणाºया संघर्ष यात्रेनंतर फेरबदलांचा मुहूर्त शोधण्यात आला आहे, असे सांगण्यात येत आहेत.
कार्याध्यक्षपदाचा फार्मुला
शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या विरोधात असलेल्या नाराजीमुळे त्यांना बदलण्याचा विचार सुरू आहे. तो शक्य न झाल्यास राष्टÑवादी कॉँग्रेसप्रमाणेच शहर आणि जिल्हाध्यक्षपदासाठी कार्याध्यक्ष नियुक्तीचा फार्मुलादेखील विचाराधीन असल्याचे सांगण्यात येत आहे. संघर्ष यात्रा झाल्यानंतर किंवा पितृपक्षानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहर आणि जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी आणि नाराजीच्या वातावरणाचा संघर्ष यात्रेवरही परिणाम झाला असून, ही यात्रा एका दिवसात नाशिकमध्ये उरकण्यात येत आहे.

Web Title: District-City President Removal Campaign in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.