शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जिल्हा बँकेचे एक हजार कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:23 IST

ग्रामपंचायतीची निवडणूक आचारसंहिता व त्या पाठोपाठ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत सापडली असून, जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरवूनही निव्वळ तांत्रिक बाबींमुळे बँकेचे एक हजार कोटी रुपये शासनाकडे अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री असूनही चेअरमन वगळता बँकेवर सर्वपक्षीय संचालक असताना बँकेची हेळसांड व पर्यायाने खरिपासाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचण वाढली आहे.

ठळक मुद्देअगोदर आचारसंहिता नंतर लॉकडाउन

नाशिक : ग्रामपंचायतीची निवडणूक आचारसंहिता व त्या पाठोपाठ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत सापडली असून, जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरवूनही निव्वळ तांत्रिक बाबींमुळे बँकेचे एक हजार कोटी रुपये शासनाकडे अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री असूनही चेअरमन वगळता बँकेवर सर्वपक्षीय संचालक असताना बँकेची हेळसांड व पर्यायाने खरिपासाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचण वाढली आहे.राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली, त्यानुसार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक लाख ५८६५ शेतकºयांच्या कर्ज खात्याची माहिती शासनाकडे सादर केली. या शेतकºयांचे सुमारे ९७० कोटी ५३ लाख रुपये इतके कर्ज आहे. शासनाच्या मान्यतेने फेब्रुवारी महिन्यात बँकेने ही माहिती शासनाला कळविली, परंतु त्याचदरम्यान राज्यात नाशिकसह ५ जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यामुळे आचारसंहितेच्या कारणास्तव शासनाने जिल्हा बँकेच्या कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरणाºया शेतकºयांची यादी जाहीर केली नाही, मात्र बँकेने सदरची यादी शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली. शासन जोपर्यंत ती जाहीर करीत नाही, तोपर्यंत त्या यादीतील कर्जदार शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण करता येत नाही, आधार प्रमाणिकरणासाठी शेतकºयांना सोसायट्यांवर कागदपत्रे घेऊन जावे लागणार आहे. मात्र तशी वेळ येण्यापूर्वीच मार्च महिन्यात देशात व राज्यात कोरोनाचे थैमान घालण्यास सुरुवात केली, परिणामी ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, मात्र शेतकरी कर्जमुक्तीचा विषय मागे पडला आहे.बँकेची एकूण आर्थिक परिस्थिती पाहता येणाºया खरीप हंगामात शेतकºयांना पुन्हा पीककर्ज वाटप करण्यासाठी शासन एकीकडे बँकांवर दबाव टाकत आहे तर दुसरीकडे शासनाकडे थकीत असलेली रक्कम बँकेला परत मिळत नाही. त्यामुळे जिल्हा बँक दुहेरी पेचात सापडली आहे.कर्जमुक्तीच्या याद्यांचे काम मागे पडलेलॉकडाउन, संचारबंदी आणि शासनाचे गर्दी न करण्याचे आवाहन पाहता जिल्हा बँकेच्या शेतकरी कर्जमुक्तीच्या याद्यांचे कामही मागे पडले, परिणामी जिल्हा बँकेच्या कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करणे व त्यापोटी मिळणाºया सुमारे हजार कोटी रुपयंपासून वंचित रहावे लागत आहे.

टॅग्स :NashikनाशिकbankबँकMONEYपैसा