कळवणला ५० ट्रॅक्टर जप्त जिल्हा बॅक वसुली मोहीम : ६५ लाखांची थकबाकीही वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:52 IST2018-03-08T00:52:40+5:302018-03-08T00:52:40+5:30
कळवण : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने वसुली मोहिमेतर्गंत बुधवारी कळवणला राबविलेल्या मोहिमेत ५० ट्रॅक्टर जप्त केले. शिवाय ६५ लाखांची थकबाकी वसुली करण्यात आल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

कळवणला ५० ट्रॅक्टर जप्त जिल्हा बॅक वसुली मोहीम : ६५ लाखांची थकबाकीही वसूल
कळवण : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने वसुली मोहिमेतर्गंत बुधवारी कळवणला राबविलेल्या मोहिमेत ५० ट्रॅक्टर जप्त केले. शिवाय ६५ लाखांची थकबाकी वसुली करण्यात आल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
वाहन कर्ज थकविणाºयांची वाहने जप्त करून त्याचा लिलाव करावा, थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचा बोजा चढविण्यात यावा, असा आदेश बॅँकेचे अध्यक्ष केदा पाटील आहेर यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिल्याने ही मोहीम राबविण्यात आली. बँकेने थकबाकी वसुली करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने थकबाकीदार धास्तावले आहेत. थकबाकीदारांमध्ये विविध कार्यकारी संस्थेच्या संचालकाची नावे समाविष्ट असतील तर अशा थकबाकीदार संचालकांवर सहकार कायद्यान्वये अपात्र ठरविण्याचे प्रस्ताव सहकारी संस्था तालुका उपनिबंधक यांच्याकडे दाखल करण्याचे आदेशही अध्यक्ष अहेर यांनी दिला आहे.
कर्जाने घेतलेले ट्रॅक्टर जप्त करायला गेल्यानंतर ट्रॅक्टर जागेवर नसल्यास थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करावेत तसेच ज्या थकबाकीदार सभासदांवर जप्ती बोजे लागले असतील व ते सभासद कर्ज फेडत नसतील तर हे प्रकरण निबंधक कार्यालयात दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.वसुली पथकाने जप्त केलेल्या ट्रॅक्टरपैकी ७ ट्रॅक्टर मालकांनी थकबाकी भरल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली आहे. पथकाने उर्वरित ४३ ट्रॅक्टरमालकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. वाहन कर्जाचे कर्जदारांनी नियमित हप्ते भरले व किती थकबाकीदार आहेत याची माहिती घेऊन ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांची वाहने जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.