वेद पुरस्कारांचे वितरण

By Admin | Updated: April 29, 2017 02:02 IST2017-04-29T02:01:47+5:302017-04-29T02:02:14+5:30

नाशिक : चित्तपावन समाजातील विविध व्यक्तींनी समाजाचा झेंडा जगभरात फडकवला आहे

Distribution of Ved Awards | वेद पुरस्कारांचे वितरण

वेद पुरस्कारांचे वितरण

 नाशिक : चित्तपावन समाजातील विविध व्यक्तींनी समाजाचा झेंडा जगभरात फडकवला आहे. परंतु, देशातील शैक्षणिक परिस्थिती आणि आरक्षणामुळे दुरावलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे शिक्षणासाठी परदेशी गेलेले विद्यार्थी पुन्हा मायदेशी परतत नाही व त्यांच्या वृद्ध माता-पित्यांवर उतारवयात एकाकी जीवन जगण्याची वेळ येते. त्यामुळे परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या तसेच परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मायदेशी परतण्याची इच्छाशक्ती निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
गोळे कॉलनीतील काका गदे्र मंगल कार्यालयात चित्तपावन ब्राह्मण संघातर्फे परशुराम वेद पुरस्कारांचे शुक्रवारी (दि. २८) टिळक यांच्या हस्ते वितरण करण्यात आले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, संस्थेचे अध्यक्ष विजय साने, विश्वस्त दिनकर बर्वे, श्रीरंग वैशंपायन, अभय खरे आदी उपस्थित होते.
यावेळी नाशिक चित्तपावन ब्राह्मण संघातर्फे येथील गद्रे मंगल कार्यालयात परशुराम वेद पुरस्कारांचे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पुण्याचे महेश सोवनी यांना ऋग्वेद, त्र्यंबकेश्वरचे शैलेंद्र काकडे यांना यजुर्वेद, नांदेडचे सचिन कुलकर्णी यांना अथर्ववेद व लातूरचे श्रीधर अघोर यांना सामवेद पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात
आले.
याप्रसंगी नाशिकच्या महापौर रंजना भानसी, संस्थेचे अध्यक्ष विजय साने, अभय खरे, विश्वस्त दिनकर बर्वे, श्रीरंग बर्वे आदी उपस्थित होते. यावेळी टिळक यांच्या हस्ते पुण्याचे महेश सोवनी यांना ऋग्वेद, त्र्यंबकेश्वरचे शैलेंद्र काकडे यांना यजुर्वेद, नांदेडचे सचिन कुलकर्णी यांना अथर्ववेद व लातूरचे श्रीधर अघोर यांना सामवेद पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)परशुराम वेद पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारार्थी महेश सोवनी, शैलेंद्र काकडे, सचिन कुलकर्णी, श्रीधर अघोर यांना पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, विजय साने, अभय खरे, दिनकर बर्वे, श्रीरंग बर्वे आदी.

Web Title: Distribution of Ved Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.