करंजाळी येथे विविध दाखल्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:17 IST2019-12-27T22:16:29+5:302019-12-27T22:17:21+5:30
महाराजस्व अभियान अंतर्गत विविध दाखले वाटप शिबिरात जातीचे दाखले, अधिवास दाखले, वनहक्क प्रमाणपत्र, दुय्यम शिधापत्रिका आणि अनुसूचित भागात खातेफोड मोहीम राबविणे अंतर्गत म.ज.म.अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये शेतजमीन वाटप आदेशाचे वितरण तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

करंजाळी येथे दाखले वाटपप्रसंगी तहसीलदार संदीप भोसले, प्रकाश गोतरणे, शंकरदास महाराज, समीर मुळे, कृष्णा गावंढे, प्रकाश पालवे, जितेंद्र क्षीरसागर आदी.
पेठ : करंजाळी, ता. पेठ येथे महाराजस्व अभियान अंतर्गत विविध दाखले वाटप शिबिरात जातीचे दाखले, अधिवास दाखले, वनहक्क प्रमाणपत्र, दुय्यम शिधापत्रिका आणि अनुसूचित भागात खातेफोड मोहीम राबविणे अंतर्गत म.ज.म.अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये शेतजमीन वाटप आदेशाचे वितरण तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंडळ अधिकारी प्रकाश गोतरणे, तलाठी समीर मुळे, कृष्णा गावंढे, प्रकाश पालवे, जितेंद्र क्षीरसागर, मनोज वाकतकर, उत्तम चेबाळे, सरपंच सुरेखा गवळी, पोलीसपाटील मनोहर गवळी यांच्यासह सरपंच, पोलीसपाटील, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.