आदिवासी मातांकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 17:36 IST2019-07-19T17:36:43+5:302019-07-19T17:36:57+5:30
सिन्नर: युनेस्को मानांकित तालुक्यातील जिल्हा परिषद डिजीटल शाळा ठाकरवाडी येथे आदर्श लोकसहभाग उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशाचे वाटप करण्यात आले.

आदिवासी मातांकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
सिन्नर: युनेस्को मानांकित तालुक्यातील जिल्हा परिषद डिजीटल शाळा ठाकरवाडी येथे आदर्श लोकसहभाग उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशाचे वाटप करण्यात आले.
गावातील आदिवासी भगिनीच्या बचत गटातील सभासदांनी तसेच माता पालकांनी यासाठी जवळपास २५ हजार रूपयांचा निधी संकलीत केला. आदिवासी बहुल असणाऱ्या या शाळेत विद्यार्थी पटसंख्या ८२ आहे. ठाकरवाडीतील महालक्ष्मी, सावित्रीबाई फुले बचत गट यासोबतच माता-पालक व शिक्षक पालक संघाच्या सदस्यांनी व गावातील तरूणांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा गणवेशासाठी आर्थिक योगदान दिले. बचत गटातील महिलांच्या उपस्थीतीत या गणवेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.