तुलसी विवाहनिमित्त तुळशीच्या रोपांचे वाटप

By Admin | Updated: November 26, 2015 22:49 IST2015-11-26T22:48:42+5:302015-11-26T22:49:17+5:30

तुलसी विवाहनिमित्त तुळशीच्या रोपांचे वाटप

Distribution of Tulsi seedlings on the occasion of Tulsi wedding | तुलसी विवाहनिमित्त तुळशीच्या रोपांचे वाटप

तुलसी विवाहनिमित्त तुळशीच्या रोपांचे वाटप

नाशिकरोड : कार्तिक पौर्णिमा व तुलसी विवाहनिमित्त जयभवानीरोड येथील श्री भगवती माता मंदिरात रहिवासी, महिलांना शिवसेनेच्या वतीने तुळशीच्या रोपाचे वाटप करण्यात आले.
श्री भगवती माता मंदिरात बुधवारी सकाळी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते कार्तिक पौर्णिमा व तुलसी विवाहनिमित्त नागरिक, महिला, युवती यांना तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन चिडे, शाम खोले, बाबा बच्छाव, सुनील देवकर, किरण गायकवाड, योगेश देशमुख, अमित भगत, मोहन औटे, वसंत औटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नील औटे यांनी केले. सूत्रसंचलन सागर काकडे व आभार मनोज औटे यांनी मानले. यावेळी अभिलाष सोनार, निवृत्ती सगर, विजय बोराडे, चेतन पाटील, सागर कापरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Distribution of Tulsi seedlings on the occasion of Tulsi wedding