जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील २५२ लाभार्थ्यांना स्वेटर व भेटवस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अमास सेवा ग्रुप, मुंबईचे सदस्य चंद्रकांतभाई देढिया, लायनेस क्लब ऑफ जुहू रोडच्या अध्यक्ष छायाबेन पारेख, सदस्य हेमाबेन शहा, अशोक भाई, हरिश्चंद्र भोये, सरपंच हरी घुटे, पोलीसपाटील तुंगार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंजना गुंबाडे, मुख्याध्यापक पंढरीनाथ वालवणे, घंटेवाड, पुष्पा मौळे, इंदिरा महाले यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
पाटे येथील बालकांना स्वेटरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 17:59 IST