मोहगाव येथे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:36 IST2020-06-17T22:19:55+5:302020-06-18T00:36:04+5:30
एकलहरे : मोहगाव येथे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकºयांसाठी कांदाचाळ, शेडनेट हाउस, पॉलिहाउस, हरितगृहात उच्चप्रतीचा भाजीपाला लागवड, ८ ते २० एचपीपर्यंतचा ट्रॅक्टर, स्प्रे पंप, पावर आॅपरेटेड स्प्रे पंप आदींसह बी-बीयाणे पुरविले जात आहेत.

मोहगाव येथे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप
एकलहरे : मोहगाव येथे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकºयांसाठी कांदाचाळ, शेडनेट हाउस, पॉलिहाउस, हरितगृहात उच्चप्रतीचा भाजीपाला लागवड, ८ ते २० एचपीपर्यंतचा ट्रॅक्टर, स्प्रे पंप, पावर आॅपरेटेड स्प्रे पंप आदींसह बी-बीयाणे पुरविले जात आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी आर.डी. वाघ, सरपंच मंगला पगारे, उपसरपंच सिंधूबाई टिळे, भाजप नाशिक तालुका सरचिटणीस सुनील जाधव, कृषी पर्यवेक्षक संजय चौधरी, कृषी सहायक रणजित आंधळे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, मायभूमी शेतकरी महिला बचतगटाच्या अध्यक्ष मनीषा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शासकीय आदेशानुसार शेतकºयांच्या बांधावर जाऊन मायभूमी महिला शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन रणजित आंधळे यांनी केले. यावेळी शेतकरी सुनील टिळे, रामराव जाधव, ज्ञानेश्वर टिळे, फुल्याबाई पगारे, नागेश टिळे व ग्रामस्थ उपस्थित होते.