वाकी येथील शाळेत गणवेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 19:15 IST2021-01-27T19:14:44+5:302021-01-27T19:15:27+5:30
वैतरणानगर : जि. प .शाळा वाकी ता. इगतपुरी येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय आवारात ध्वजारोहणापूर्वी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र परदेशी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जि. प. शाळा वाकी ता इगतपूरी येथील शाळेत प्रातिनिधीक स्वरूपात गणवेश वाटप करतांना उपस्थित मान्यवर.
वैतरणानगर : जि. प .शाळा वाकी ता. इगतपुरी येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय आवारात ध्वजारोहणापूर्वी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र परदेशी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष नवनाथ काळे, ईश्वर डोळस, विजय भटाटे, घनशाम परदेशी, पार्वता डाके, सरपंच संदिप कुंदे, उपसरपंच अनिता काळे, सदस्य तानाजी कडाळी, मिना कडाळी, करणी सेना जिल्हा अध्यक्ष खंडू परदेशी, देवराम मराडे, पोलिस पाटील रोहिदास काळे, शिवनाथ काळे, सपन परदेशी, हनुमान काळे, माजी सरपंच लक्ष्मण घुटे, ग्रामसेवक गणेश मोढे, धीरज परदेशी, हिरामण भगत, साहिल डोळस, मुख्याध्यापक रवींद्र पाटील, केंद्रप्रमुख रामकृष्ण पाटील, सिद्धार्थ निंकुंभ, विद्या पाटील, भरत चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत असल्याने मार्गदर्शक सुचना उपस्थितांना मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी समजावून सांगितल्या. कार्यक्रमानंतर शिक्षकांनी शाळा सॅनिटाईज केली.