मनोरीत ग्रामस्थांना सँनिटायझर, मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:39 IST2020-04-18T14:35:27+5:302020-04-18T14:39:14+5:30
नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील प्रत्येक कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील ग्रामस्थांना सॅनिटायझरचे वाटप करतांना सरपंच रामदास चकणे आदी.
नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील प्रत्येक कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
सरपंच रामदास चकणे, उपसरपंच सविता नवले, आरोग्य सेवक ए. बी. गांगुर्डे, ग्रामसेवक एस. के. सानप, कर्मचारी रवींद्र पवार, रमेश लोहकरे आदींनी गावात फिरून संपूर्ण गाव चार दिवस लॉकडाऊन करण्याबाबत ग्रामस्थांना आवाहन केले. त्यानुसार किराणा दुकानदारांसह अन्य वकयवसायीकांनी देखिल आपले व्यवहार बंद ठेवले. या दरम्यान ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबांना किटचे वाटप करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत अंगणवाडी व आशा सेविकांच्या मदतीने गावातील ग्रामस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले.