शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
2
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
3
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
4
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
5
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
6
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
7
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
8
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
9
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
10
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
11
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
12
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
13
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
14
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
15
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
17
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
18
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
19
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
20
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश

आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:45 IST

पेठ : ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात असून, यासाठी नियुक्त केलेल्या आरोग्य व सरकारी कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जावी म्हणून सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.

पेठ : ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात असून, यासाठी नियुक्त केलेल्या आरोग्य व सरकारी कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जावी म्हणून सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.  करंजाळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉॅ. सिद्धांत वैद्य यांच्या हस्ते कर्मचाºयांना मास्क, सॅनिटायझर व फेस सील्डचे वाटप करण्यात आले. तालुका शीघ्र कृती पथकच्या मार्गदर्शनाखाली सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र करंजाळी कार्यक्षेत्रात आशा, एएनएम,आरोग्य सेवक, आरोग्य सहायक यांच्याद्वारे घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक सर्वेक्षण चालू आहे. सर्दी, खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास रु ग्णाचे सर्वेक्षण तसेच बाहेरगावाहून तसेच हॉट स्पॉट क्षेत्रातून आलेले होम क्वॉरण्टाइन नागरिकांना दिवसातून दोन वेळा भेट व पाळत ठेवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कोरोना योद्ध्यांना संसर्ग टाळणे व विषाणूपासून बचावासाठी फेस सिल्ड, मास्क वाटप करण्यात आले. जेणेकरून डोळे, नाक व तोंड झाकले जाऊन डबल प्रोटेक्शन मिळेल व आरोग्य कर्मचारी स्वस्थ राहून जोमाने काम करतील. प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धांत वैद्य, बाळासाहेब चौधरी, प्रफुल्ल राठोड, वैशाली गवळी, ज्ञानेश्वर गवळी, उपसरपंच बामणे, औषधनिर्माण अधिकारी शेखर चित्ते, कर्मचारी प्रदीप ढाकणे आदी उपस्थित होते.--------पेठ तालुक्यातील जनतेला आवाहन करण्यात येते की, कोरोना आजाराचा संसर्ग महाराष्ट्र व देशात झालेला आहे, त्यामुळे लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. घरीच राहा, सुरक्षित राहा. मास्कचा वापर अवश्य करा. वारंवार हात धुवा. सध्या पेठ तालुक्यात एकही कोरोनाचा रु ग्ण नाही त्यामुळे आपण याबाबतीत सतर्कराहून कोरोनासारख्या महामारीला तालुक्यात शिरकाव करू न देता संपूर्ण जिल्हा व महाराष्ट्र कोरोनामुक्त करूया.- डॉ. मोतीलाल पाटील,तालुका आरोग्य अधिकारी, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक