निमगाव महाविद्यालयात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 16:09 IST2020-03-05T16:09:17+5:302020-03-05T16:09:31+5:30

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या राज्यस्तरीय युवा साहित्य महोत्सवात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

Distribution of prizes for various competitions at Nimgaon College | निमगाव महाविद्यालयात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

निमगाव महाविद्यालयात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या राज्यस्तरीय युवा साहित्य महोत्सवात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेत कर्मवीर भाऊसाहेब हिरे काव्य वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, उत्स्फूर्त वक्तृत्व, कथाकथन व प्रश्नमंजुषा स्पर्धांचा समावेश होता. कर्मवीर काव्य करंडक फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थ्यांनी जिंकला. अमोल मसलखांब, नितीन जाधव यांनी तो स्वीकारला.
प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊसाहेब हिरे काव्य वाचन स्पर्धेचे उद्घाटन कवी प्रा. प्रशांत मोरे यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. अपूर्व हिरे होते. राज्यातील विविध विद्यापीठातून १७२ विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला.

Web Title: Distribution of prizes for various competitions at Nimgaon College