महावीर विद्यालयाचे पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:32 IST2020-01-24T21:49:02+5:302020-01-25T00:32:13+5:30
महावीर विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेल्स टॅक्स डेप्युटी कमिशनर प्रशांत शेळके होते.

लासलगाव येथील महावीर विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी दीपक पाटील, प्रशांत शेळके, कुणाल दराडे, डॉ. तुषार संकलेचा, जव्हेरीलाल ब्रम्हेचा, शांतीलाल जैन, सुनील आब्बड आदी.
लासलगाव : येथील महावीर विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेल्स टॅक्स डेप्युटी कमिशनर प्रशांत शेळके होते. प्रमुख अतिथी म्हणून लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, कुणाल दराडे, डॉ.तुषार संकलेचा, दत्ताजी वाकचौरे, अनिल ब्रम्हेचा, बिपीन ब्रम्हेचा, सोमनाथ निकम, केशव तुंगार, ऋषभ भंडारी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.