Distribution of prizes for the 'Build a fort' contest at Thangaon | ठाणगाव येथे ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचे बक्षीस वितरण
ठाणगाव येथे ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचे बक्षीस वितरण

येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालयात दिवाळीच्या सुटीमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर माजी सरपंच नामदेव शिंदे, शालेय समितीचे सदस्य अरुण केदार, डी. एम. आव्हाड, अंकुर काळे, सागर भोर, प्राचार्य व्ही. एस. कवडे आदी उपस्थित होते. किल्ले बनवा ही स्पर्धा श्री शिवसमर्थ मंडळाच्या वतीने रामदास भोर, अंकुर काळे, सागर भोर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. यावेळी अंकुर काळे व सागर भोर यांनी गड किल्ल्यांविषयी माहिती दिली. सुत्रसंचालन ए. बी. कचरे यांनी केले.

Web Title:  Distribution of prizes for the 'Build a fort' contest at Thangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.