सामानगावला पोषण आहाराचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:29 IST2020-09-16T23:37:18+5:302020-09-17T01:29:30+5:30
एकलहरे: राष्ट्रिय पोषण आहार अभियानाअंतर्गत सामनगाव येथे कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सचिन युवराज जगताप होते.

सामानगावला पोषण आहाराचे वाटप
एकलहरे: राष्ट्रिय पोषण आहार अभियानाअंतर्गत सामनगाव येथे कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सचिन युवराज जगताप होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन अंगणवाडी पर्यवेक्षिका सुवर्णा सिन्नरकर, माजी पंचायत समिती सदस्य नितिन सयाजी जगताप, ग्रामपंचायत सदस्य किशोर बागुल, भुषण घायवटे, ग्रामविकास अधिकारी बापु पवार उपस्थित होते.
यावेळी सामनगाव ग्रामपंचायत हद्दीतील चार अंगणवाडीतील 24 कुपोषित बालकांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले. यामध्ये बटाटे, गुळ, शेंगदाणे, हिरवे मुग, खोबरेलतेल या वस्तुंचा समावेश आहे. यावेळी बालकांना पोषण आहार देण्याची प्रक्रीया, हिरव्या भाज्या, फळे, पौष्टिक खाद्य यापासून शरिरास होणारे सकारात्मक परिणाम या विषयी सुवर्णा सिन्नरकर यांनी माहिती दिली.नितीन जगताप यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ( फोटो ल्ल२‘ वर पोषण)
सामनगाव येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप करतांना अंगणवाडी पर्यवेक्षिका सुवर्णा सिन्नरकर, उपसरपंच सचिन जगताप, ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, किशोर बागुल, ग्रामविकास अधिकारी बापु पवार आदी.