करंजवण ग्रामपंचायत मार्फत कुपोषीत बालकांना सकष आहार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 04:36 PM2020-10-20T16:36:39+5:302020-10-20T16:38:09+5:30

दिंडोरी : नाशिक जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या प्रेरणेतून एक मुठ पोषण अभियान अर्तगत करंजवण येथील तीन अंगणवाडी केंद्रातील कुपोषीत बालकांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रति बालक २ किलो शेंगदाणे, २ किलो गुळ, ३ किलो बराटे, ५०० मिली खोबरेल तेल व अन्य सकष आहार वाटप करण्यात आला.

Distribution of nutritious food to malnourished children through Karanjwan Gram Panchayat | करंजवण ग्रामपंचायत मार्फत कुपोषीत बालकांना सकष आहार वाटप

दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सकस आहाराचे वाटप करताना एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी रमेश बनकर, नानासाहेब देशमुख, ग्राम विकास अधिकारी अरुण आहेर अंगणवाडी सेविका चंद्रकला देशमुख आदी मान्यवर

Next
ठळक मुद्दे तीनही अंगणवाडी केंद्रातील एकूण ४७ कुपोषीत बालकांना सकष आहार वाटप

दिंडोरी : नाशिक जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या प्रेरणेतून एक मुठ पोषण अभियान अर्तगत करंजवण येथील तीन अंगणवाडी केंद्रातील कुपोषीत बालकांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रति बालक २ किलो शेंगदाणे, २ किलो गुळ, ३ किलो बराटे, ५०० मिली खोबरेल तेल व अन्य सकष आहार वाटप करण्यात आला.
पंचायत समिती सदस्य मालता खराटे यांच्या अध्यक्षतेखाली व दिंडोरी पंचायत समिती महिला बालविकास प्रकल्प अधिकारी आर. एन. बनकर, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ . सुजीत कोशीरे यांचे प्रमुख उपस्थीतीत करंजवण हद्दीतील तीनही अंगणवाडी केंद्रातील एकूण ४७ कुपोषीत बालकांना सकष आहार वाटप करण्यात आला .
यावेळी उपस्थीत माता व पालकांना आहाराचे नियोजन, मार्गदर्शन महिला बालविकास प्रकल्प अधिकारी बनकर यांनी केले. त्याच प्रमाणे गरोदरपणात व बाळतंपणात मातेने औषधोपचार, आहार , लसीकरण, माझे कुंटूब माझी जबाबदारी व इतर आरोग्य विषयक मार्गदर्शन तालुका वैद्यकीय अधिकारी कोशिरे यांनी केले. ग्रामविकास अधिकारी अरूण आहेर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी तंटा मुक्तीचे अध्यक्ष नानासाहेब देशमुख, पोलीस पाटील संदीप शाईल, दशरथ कोंड, दगडू खराटे, शिवाजीराव देशमुख, पोपटराव देशमुख, केशव देशमुख, अंगणवाडी सेविका चंद्रकला देशमुख, भारती देशमुख, सुरेखा देशमुख, कुपोषीत बालकांचे पालक, ग्रामविकास अधिकारी अरूण आहेर व ग्रामस्थ उपस्थीत होते.

 

Web Title: Distribution of nutritious food to malnourished children through Karanjwan Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.