नाशिक-पुणे रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:18 IST2019-12-23T00:08:49+5:302019-12-23T00:18:08+5:30
नाशिक-पुणे महामार्गाकडून एकलहरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गाला लागूनच असलेल्या नाल्यावरील रस्ता खचला आहे. या ठिकाणी कायम वर्दळ असलेल्या रस्त्याच्या कडेलाच मोठा खड्डा पडल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक-पुणे रस्त्याची दुरवस्था
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गाकडून एकलहरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गाला लागूनच असलेल्या नाल्यावरील रस्ता खचला आहे. या ठिकाणी कायम वर्दळ असलेल्या रस्त्याच्या कडेलाच मोठा खड्डा पडल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या नाल्यावर काही दिवसांपूर्वीच माती टाकून एकलहरेकडे जाणारा रस्ता तयार करण्यात आला. आता या नाल्यावरील रस्ता खचला असून, यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा येथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून होत आहे.