विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
By Admin | Updated: October 24, 2016 23:50 IST2016-10-24T23:49:33+5:302016-10-24T23:50:00+5:30
निरगुडपाडा : आदिवासी शाळेत उपक्र म

विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
अभोणा : कळवण तालुक्यातील निरगुडपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करणे हा उपक्र म कायम असून नुकताच या शाळेत हतगड येथील डॉ. सुनील सांळुखे यांनी आपला मुलगा धनेश याचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले व त्या अनुषंगाने सर्व शालेय १८ विद्यार्थ्यांना बुट व लेखन साहित्य वाटप केले. या प्रसंगी विस्तार अधिकारी एस.बी मारवाड , केंद्रप्रमुख रंजना दुसाने , चंद्रकांत दुसाने यांनी ग्रामस्थांना शौचालय वापरा विषयी व शाळेच्या गुणवत्ते विषयी मार्गदर्शन केले. यावेळी दत्तु गावित, मनीषा गावित,रंजना गावित, हौसा गावित, नंदा गावित, राजाराम गावित, मंगल गावित, अर्जुन गावित, पुंडलिक गावित, रमेश गावित आदि उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक हरिश्चंद्र देसले, उपशिक्षक राहुल वानखडे यांनी परिश्रम घेतले .(वार्ताहर)