ग्रामीण पोलिस अधिकार्यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 14:32 IST2020-09-30T14:32:35+5:302020-09-30T14:32:35+5:30
सिन्नर: बारागावपिंप्री येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस दलाचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह अधिकार्यांचा कोरोनाच्या काळात उत्कृष्ट सेवा बजावत असल्यामुळे मुख्यालयात जाऊन सन्मान केला.

ग्रामीण पोलिस अधिकार्यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण
सिन्नर: बारागावपिंप्री येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस दलाचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह अधिकार्यांचा कोरोनाच्या काळात उत्कृष्ट सेवा बजावत असल्यामुळे मुख्यालयात जाऊन सन्मान केला. पोलिस कोरोनाकाळात संसर्ग रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत असल्याने त्यांना मास्क आणि सॅनिटायझरची आवश्यकता असल्याने गोसावी यांच्या वतीने येथील अधिकारी आणि कर्मचार्यांना त्याचे वितरण करण्यात आले. गोसावी यांनी सिन्नर तालुक्यातील पोलिसांसह इतरही सामाजिक संघटना, आरोग्य विभागात काम करणार्या कर्मचार्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.