पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:50 IST2021-05-30T21:28:25+5:302021-05-31T00:50:48+5:30
येवला : भाजप युवा मोर्च्याच्या वतीने शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांना जिल्हाध्यक्ष सचिन दराडे यांच्या हस्ते मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

येवला शहर पोलीस ठाण्यात भाजप युवा मोर्चातर्फे पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करताना सचिन दराडे, मयूर मेघराज, तरंग गुजराथी, मनोज दिवटे, आदी.
ठळक मुद्देसरकारला सात वर्षे पूर्ण
येवला : भाजप युवा मोर्च्याच्या वतीने शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांना जिल्हाध्यक्ष सचिन दराडे यांच्या हस्ते मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ह्यसेवाही संघटनह्ण या कार्यक्रमाअंतर्गत सदर उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज, भाजप शहराध्यक्ष तरंग गुजराथी, मनोज दिवटे, बाळासाहेब देशमुख, प्रणव दीक्षित, मयूर रूणवाल, ललित वाखारे, हेमंत सांबर, सौरभ रूणवाल, वैष्णव पवार, श्रेयस चोरडिया, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.