पिंप्री (रौळस) येथे कडबा कुट्टी यंत्राचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 00:56 IST2021-02-24T19:16:00+5:302021-02-25T00:56:20+5:30

निफाड : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत निफाड तालुक्यातील दावचवाडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - २ मार्फत ५० टक्के अनुदानावर पिंप्री (रौळस ) येथील दहा पशुपालकांना कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी वंध्यत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन करून खनिज मिश्रण औषधांचे वाटप करण्यात आले.

Distribution of Kadba Kutti Yantra at Pimpri (Roulas) | पिंप्री (रौळस) येथे कडबा कुट्टी यंत्राचे वाटप

पिंप्री (रौळस) येथे लाभार्थी पशुपालकांना कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. विष्णू गर्जे, सिद्धार्थ वनारसे, शिवा सुरासे , डॉ सुनिल आहिरे,डॉ. राजेंद्र केदार आदी.

ठळक मुद्दे वंध्यत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन करून खनिज मिश्रण औषधांचे वाटप करण्यात आले.

निफाड : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत निफाड तालुक्यातील दावचवाडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - २ मार्फत ५० टक्के अनुदानावर पिंप्री (रौळस ) येथील दहा पशुपालकांना कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी वंध्यत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन करून खनिज मिश्रण औषधांचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुरासे, विभागीय पशुसंवर्धन सहआयुक्त नाशिक डॉ बाबूराव नरवडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, सहाय्यक आयुक्त डॉ. रवींद्र चांदोरे, सहाय्यक गट विकास अधिकारी सानप, पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील अहिरे, पशु चिकित्सा व्यवसाय संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. भगवान पाटील आदी मान्यवर होते उपस्थित होते. सदर योजना राबवण्यासाठी विभागीय पशुसंवर्धन सहआयुक्त नाशिक डॉ बाबुराव नरवडे यांचे सहकार्य लाभले. दिलीप आहेर यांनी सूत्रसंचालन केले.
 
Web Title: Distribution of Kadba Kutti Yantra at Pimpri (Roulas)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.