नायगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायतीच्या वतीने अॅरसॅनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. ग्रामस्थांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंगणवाडी शिक्षक, मदतनीस आणि आशासेविका यांच्यामार्फत घरोधरी जाऊन गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायतीने लाँकडाऊनच्या काळात गरीब व गरजू लोकांना धान्य, सॅनिटायझर आदींचे मोफत वाटप केले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप, सरपंच छाया नवाळे, उपसरपंच सोमनाथ दराडे, पोलीसपाटील मोहन सांगळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू नवाळे, माजी सरपंच संजय सानप आदी उपस्थित होते.
नायगाव येथे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 18:42 IST