विंचूरला पंचायत समितीतर्फे घरघंटीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 15:45 IST2019-03-07T15:44:51+5:302019-03-07T15:45:01+5:30

महिला व बाल विकास योजनेअंतर्गत ११ लाभार्थ्यांना घरघंटीचे वाटप

Distribution of home-based bills by Panchayat Samiti | विंचूरला पंचायत समितीतर्फे घरघंटीचे वाटप

विंचूरला पंचायत समितीतर्फे घरघंटीचे वाटप

ठळक मुद्देविंचूर बीट मधील अंगणवाडीतील मुलांचा कला गुणदर्शन कार्यक्र म

विंचूर : येथे विंचूर बीट मधील अंगणवाडीतील मुलांचा कला गुणदर्शन कार्यक्र म नुकताच संपन्न झाला. यावेळी पंचायत समितीमार्फत महिला व बाल विकास योजनेअंतर्गत ११ लाभार्थ्यांना घरघंटीचे वाटप करण्यात आले.
बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने यांचेसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुंडे, गटविकास अधिकारी संदीप कराड ,बालविकास प्रकल्प आधिकारी मोहन तुपे, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, शिवा सुरासे, सरपंच सौ ताराबाई क्षीरसागर, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कैलास सोनवणे, ग्रामपालिका सदस्य अविनाश दुसाने आदी उपस्थित होते. यावेळी प्रज्ञा रुपवते, मंगला नारायणे, गायत्री नारायणे, शुभांगी निकाळे,अंजना वाघ, प्रणाली रणखंबे. वनिता गांगुर्डे, छाया पवार, श्रीमती मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे आयोजन पर्यवेक्षिका खांदवे व सर्व सेविका मदतनिस यांनी केले होते.

 

Web Title: Distribution of home-based bills by Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक