ठाणगावच्या २६ कुटुबांना किराणा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:10 IST2021-05-03T04:10:12+5:302021-05-03T04:10:12+5:30

आशीर्वाद प्रतिष्ठान व जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने ठाणगाव येथील २६ गरीब कुटुंबाला साखर, गोडतेल, गहू, तांदूळ, चहा-पावडर व डाळीचे वाटप ...

Distribution of groceries to 26 families of Thangaon | ठाणगावच्या २६ कुटुबांना किराणा वाटप

ठाणगावच्या २६ कुटुबांना किराणा वाटप

आशीर्वाद प्रतिष्ठान व जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने ठाणगाव येथील २६ गरीब कुटुंबाला साखर, गोडतेल, गहू, तांदूळ, चहा-पावडर व डाळीचे वाटप करण्यात आले.

जनसेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष रामदास भोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी डी. एम. आव्हाड, प्रगतशील शेतकरी अशोक काकड, अनिल शिंदे, अर्जुन आव्हाड, भाऊसाहेब शिंदे, सुनील गोसावी, शंकर अमाले, आशीर्वाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक कचरे आदी उपस्थित होते.

गावातील कष्टकरी, भूमिहीन, विधवा महिला व कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या कुटुंबाला मदत केली. त्यामध्ये हसीना मनियार, राजू शेलार लाखाबई मणियार, दिलीप धोंगडे, चित्रा कातोरे, इंदूबाई भले काळेवाडी, लता कातोरे, राजू गोसावी, दत्ता लोहार डगळे, चिमणराव गोसावी, अनिल वाडारे ऊर्फ शिंदे, सुरेश मेंगाळ, रामू गाडेकर, रामू बर्डे, दशरथ बर्डे, नारायण डगळे, राहील मणियार, भय्या मनियार,

चंदू कातोरे, लीलाबाई शिंदे, लक्ष्मीबाई शिंदे आदींच्या कुटुंबांना मदत करण्यात आली.

कोट...

'या कोरोना महामारीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांचे दुःख आपण वाटून घेऊ शकत नसलो तरी त्यांच्या दुःखात आपण सहभागी होऊन त्यांना आधार देऊ शकतो. या कर्मवीरांच्या शिकवणुकीतून पुढे वाटचाल करण्याचा व माणुसकी जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आशीर्वाद प्रतिष्ठानच्या वतीने करत आहोत.

-अशोक कचरे, अध्यक्ष आशीर्वाद प्रतिष्ठान

फोटो ओळी- ०२ ठाणगाव १

ठाणगाव येथील आशीर्वाद प्रतिष्ठान व जनसेवा मडंळ यांच्या वतीने गरिबांना किराणा वाटप करताना अशोक कचरे, रामदास भोर, डी.एम.आव्हाड, अनिल शिंदे, अर्जुन आव्हाड, भाऊसाहेब शिंदे, शंकर आमले आदी.

===Photopath===

020521\02nsk_28_02052021_13.jpg

===Caption===

ठाणगाव येथील आशिर्वाद प्रतिष्ठान व जनसेवा मडंळ यांच्या वतीने गरिबांना किराणा वाटप करतांना अशोक कचरे, रामदास भोर, डी.एम.आव्हाड, अनिल शिंदे, आर्जुन आव्हाड, भाऊसाहेब शिंदे ,शंकर आमले यांच्यासह आदी.

Web Title: Distribution of groceries to 26 families of Thangaon