कापसे फाउण्डेशनतर्फेवस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:13 PM2020-04-08T23:13:17+5:302020-04-08T23:13:43+5:30

बळेगाव येथे कापसे फाउण्डेशनच्या वतीने गरजूंना मोफत जीवनावश्यक वस्तू, किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

Distribution of goods through the Cotton Foundation | कापसे फाउण्डेशनतर्फेवस्तूंचे वाटप

कापसे फाउण्डेशनतर्फेवस्तूंचे वाटप

Next

येवला : तालुक्यातील बळेगाव येथे कापसे फाउण्डेशनच्या वतीने गरजूंना मोफत जीवनावश्यक वस्तू, किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
कष्टकरी, कारागिरांची पोटाची भूक भागविण्यासाठी कापसे फाउण्डेशनने सामाजिक बांधिलकी जपत साखर, तांदूळ, खाद्यतेल, दळलेले पिठ, डेटॉल सोप, मास्क आदींचे मोफत वाटप करण्यात आले. तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या हस्ते या उपक्र माचा शुभारंभ झाला. यावेळी सरपंच मीरा कापसे, कापसे पैठणी उद्योग समूहाचे प्रमुख बाळासाहेब कापसे, उपसरपंच हर्षदा पगारे, नितीन संसारे, प्रा. जितेश पगारे, सुभाष सोमासे, रवि जमधडे, बाळासाहेब वाल्हेकर, किशोर कापसे, शंकर निकाळे, वंदना कापसे, शशिकांत जमधडे, साहेबराव कापसे आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of goods through the Cotton Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.