गरीब महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 18:04 IST2018-08-26T18:03:37+5:302018-08-26T18:04:15+5:30
सिन्नर : पंतप्रधान उज्वला गॅस योजनेंतर्गत येथील प्रभाग क्रमांक ३ मधील अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व बीपीएल रेशनकार्ड धारकांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.

गरीब महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण
सिन्नर : पंतप्रधान उज्वला गॅस योजनेंतर्गत येथील प्रभाग क्रमांक ३ मधील अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व बीपीएल रेशनकार्ड धारकांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.
संजिवणीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात दिप्तीताई वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत गरीब महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, पंचायत समिती सदस्य संगिता रामनाथ पावसे, नगरसेवक श्रीकांत जाधव, गोविंद लोखंडे, सोमनाथ पावसे, पंकज मोरे, निरूपमा शिंदे, ज्योती वामने, शोभा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजेंद्र जाधव, विष्णू साबळे, प्रवीण पठाडे, अजय गौतम, आकाश दिवान, रवींद्र पठाडे, भिमा सांगळे, दिपक आनप, यमाजी सपकाळ व लाभार्थी महिला तसेच वाजे गॅस एजन्सीचे संचालक उपस्थित होते.