शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

पहिलवानांना मोफत खुराकाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 7:45 PM

सर्वतीर्थ टाकेद : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत राज्यभरातील अनेक कुस्ती केंद्रातील कुस्तीगीर, मल्ल, कुस्तीपट्टू यांची पुरेशा खुराकाअभावी गैरसोय होत आहे. अनेकांच्या दैनंदिन होत असलेल्या कुस्ती तालमीत खंड पडला. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बु. येथील पहिलवान दत्तू गायकर यांनी गुरू हनुमान आखाडा, साकूर फाटा येथील कुस्तीगीर पहिलवानांना खुराक म्हणून काजू, बदाम, खारीक आदी ड्रायफूटचे वाटप केले.

ठळक मुद्देगुरू हनुमान आखाडा : पहिलवान गायकर यांचा उपक्रम

सर्वतीर्थ टाकेद : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत राज्यभरातील अनेक कुस्ती केंद्रातील कुस्तीगीर, मल्ल, कुस्तीपट्टू यांची पुरेशा खुराकाअभावी गैरसोय होत आहे. अनेकांच्या दैनंदिन होत असलेल्या कुस्ती तालमीत खंड पडला. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बु. येथील पहिलवान दत्तू गायकर यांनी गुरू हनुमान आखाडा, साकूर फाटा येथील कुस्तीगीर पहिलवानांना खुराक म्हणून काजू, बदाम, खारीक आदी ड्रायफूटचे वाटप केले.पैलवान दत्तू हौसाजी गायकर यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रभर वस्ताद छबू गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्त्यांचे आखाडे गाजवले आहेत. यासोबतच त्यांची ही परंपरा पहिलवान सचिन गायकर, पहिलवान श्याम गायकर हे चालवत आहेत.कोरोनासारख्या महामारी रोगामुळे कुस्ती क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. पहिलवानांचा खुराकाचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही दानशूर लोक पुढे येऊन मदत करत आहेत. पहिलवानांना मदतीचा हात म्हणून गायकर यांनी साकूर फाटा परिसरातील गुरू हनुमान आखाडा कुस्ती केंद्रातील कुस्तीगिरांना काजू, बदाम, खारीक, मनुके आदी ड्रायफूटचे वाटप केले. यावेळी वस्ताद रुंजा काळे, ज्ञानेश्वर पागेरे, वंजारवाडी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, तबन गायकर, संदीप गायकर, उत्तर महाराष्ट्र केसरी बाळू बोडके, कैलास जाधव, प्रवीण सूर्यवंशी, अविनाश सहाणे, सचिन गायकर, पहिलवान तसेच विजय गायकर, ऋषीकेश गोडसे, कृष्णा गायकर आदी उपस्थित होते.कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे. मात्र कुस्तीगीर खेळाडूंची केवळ आर्थिकदृष्ट्या खुराकावाचून गैरसोय होत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कुस्ती केंद्र आखाडे बंद असल्याने अनेकांच्या दैनंदिन तालमीत-कुस्ती सरावात मोठ्या प्रमाणात खंड पडला आहे. किमान दानशूर लोकांनी मातीतली कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी मदतरूपी हात पुढे करावेत.- दत्तू गायकर, पैलवान, नांदगाव बु. 

टॅग्स :talukaतालुकाSocialसामाजिक