वायंगाव शाळेत धान्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:45 IST2020-04-24T22:24:31+5:302020-04-24T23:45:42+5:30

औंदाणे : बागलाण तालुक्यातील वायंगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना पोषण आहाराच्या धान्याचे वितरण करण्यात आले.

 Distribution of foodgrains at Waingaon School | वायंगाव शाळेत धान्याचे वितरण

वायंगाव शाळेत धान्याचे वितरण

औंदाणे : बागलाण तालुक्यातील वायंगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना पोषण आहाराच्या धान्याचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकांनी फिजिकल डिस्टन्सचे व्यवस्थितरीत्या पालन केले.
जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते सातवीतील ३१९ विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील तांदूळ व धान्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धान्य घेण्यासाठी पालकांना बोलविण्यात आले होते. त्यांना एक मीटरच्या अंतरावर उभे करून धान्याचे वितरण करण्यात आले. यावेळी गटशिक्षण अधिकारी डी. के. घोंगडे, केंद्रप्रमुख डी. जे. काकळीज, सरपंच अशोक अहिरे, पोषण आहार समन्वयक वामन खैरनार, व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान देवरे, योगेश अहिरे, मुख्याध्यापक बाळासाहेब कापडणीस, सुभाष शिवदे, प्रवीण सावंत, रमेश सावंत, सुभाष कोर आदी उपस्थित होते.

Web Title:  Distribution of foodgrains at Waingaon School

टॅग्स :Nashikनाशिक