खर्डे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 23:00 IST2020-04-05T23:00:22+5:302020-04-05T23:00:44+5:30

खर्डे : येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारातील शिल्लक तांदूळ धान्याचे वितरण शिक्षण विस्तार अधिकारी सतीश बच्छाव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Distribution of food grains to students at Kharde Primary School | खर्डे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना धान्य वाटप

खर्डे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना धान्य वाटप

ठळक मुद्दे चौकटीत पाल्यांना उभे करूनच धान्यवाटप करण्यात आले.

खर्डे : येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारातील शिल्लक तांदूळ धान्याचे वितरण शिक्षण विस्तार अधिकारी सतीश बच्छाव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या अनुषंगाने खर्डे, ता. देवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार तांदूळ, हरभरा, मूग डाळ आदी धान्याचे समप्रमाणात वाटप करण्यात आले. शाळेतील आवारात सामाजिक अंतर ठरवून त्या जागेवर चौकट रेखाटून त्या चौकटीत पाल्यांना उभे करूनच धान्यवाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of food grains to students at Kharde Primary School