ठाणगावी शेतकरी बचतगटातर्फे लाभांश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:20+5:302020-12-05T04:21:20+5:30
आत्माअंतर्गत २०१५ साली स्थापन झालेल्या या शेतकरी बचतगटाची गुरुवारी वार्षिक सर्वसाधारण बैठक गटाचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे ...

ठाणगावी शेतकरी बचतगटातर्फे लाभांश वाटप
आत्माअंतर्गत २०१५ साली स्थापन झालेल्या या शेतकरी बचतगटाची गुरुवारी वार्षिक सर्वसाधारण बैठक गटाचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव राजाराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी या शेतकरी बचतगटात वीस सभासद असून, या प्रत्येकी सभासदांना पाच हजार रुपये लाभांश वाटप करण्याचे ठरविण्यात आले. हा गट आत्माअंतर्गत असला तरी या गटास शासनाच्या वतीने फक्त गटाची नोंदणी झाली; पण त्यानंतर गटातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन व आर्थिक मदत केली नाही. शेतकऱ्यांनी एकत्र येत पाच वर्षापासून कोणाच्याही मदतीशिवाय बचतगट सुरळीत सुरू ठेवला आहे. या बैठकीस गटातील सर्व सभासद उपस्थित होते. शेतीच्या कामासाठी या गटाची चांगली मदत होत असल्याची भावना सचिव शिंदे यांनी व्यक्त केली.