आसखेडा येथे डेअरी साहित्याचे वाटप
By Admin | Updated: October 24, 2016 23:41 IST2016-10-24T23:40:30+5:302016-10-24T23:41:21+5:30
आसखेडा येथे डेअरी साहित्याचे वाटप

आसखेडा येथे डेअरी साहित्याचे वाटप
नामपूर : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बागलाण तालुक्यातील आसखेडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात डेअरी साहित्य वाटपचा कार्यक्र म सरपंच साहेबराव कापडनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पशुधन अधिकारी डॉ. उज्ज्वल पवार, डॉ. कपिल खंडाले, चेअरमन सुभास कापडनीस, दिलीप सोनवणे, केदा भामरे उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवराच्या हस्ते योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थींना ५० टक्के अनुदानावर १५ लिटर दुधाची किटली, २० लिटरची पाण्याची बादली, १० किलो पशुखाद्य मावेल असे घमेले, १ लिटरचे माप, प्लॅस्टिक गाळणी आदि वस्तू वाटप करण्यात आल्या. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या मार्फत ही योजना राबविली जात असल्याचे पशुधन अधिकारी डॉ. आनंदा कुटे यांनी सांगितले. शेती व्यवसायाला पर्याय जोडधंदा म्हणून आज दुग्ध व्यवसाय ही चांगली संधी आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवक राजाराम अहिरे, विजय मोजाड, ललित ठाकरे यांनी परिश्रम घेतले. आसखेडा परिसरातील अनेक पशुपालक उपस्थित होते. (वार्ताहर)