कोरोना प्रतिबंधक किटचे विद्यार्थ्यांना वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:31+5:302021-02-05T05:47:31+5:30
कळवण : कळवण शिक्षण संस्था संचलित आर. के. एम. माध्यमिक विद्यालयात शासनाच्या कोरोनाविषयक सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून पाचवी ...

कोरोना प्रतिबंधक किटचे विद्यार्थ्यांना वाटप
कळवण : कळवण शिक्षण संस्था संचलित आर. के. एम. माध्यमिक विद्यालयात शासनाच्या कोरोनाविषयक सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून पाचवी ते आठवी या वर्गांचे कामकाज सुरू झाले आहे. आमदार नितीन पवार व कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक किट व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, संचालक विश्वनाथ व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कळवण बाजार समितीचे सचिव रवींद्र हिरे, प्राचार्य एल. डी. पगार, पर्यवेक्षक एन. डी. देवरे, पी. एम. महाडिक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप करण्यात आले. पहिल्या दिवशी पाचवी ते आठवीच्या ७० टक्के विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती होती. शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करत सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स यांचे तंतोतंत पालन करून विद्यार्थ्यांना विद्यालयात प्रवेश देण्यात आला. तसेच फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर यांचा वेळोवेळी वापर करा, अशा सूचना विद्यालयातर्फे देण्यात आल्या.
फोटो - २७ कळवण आरकेएम स्कूल
आर. के. एम. माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, विश्वनाथ व्यवहारे, राजेंद्र भामरे, रवींद्र हिरे, एल. डी. पगार, एन. डी. देवरे, पी. एम. महाडिक यांनी केले.
===Photopath===
270121\27nsk_41_27012021_13.jpg
===Caption===
फोटो - २७ कळवण आरकेएम स्कूल आर के एम माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक किट वाटप करतांना कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, विश्वनाथ व्यवहारे, राजेंद्र भामरे, रविंद्र हिरे, एल. डी. पगार, एन. डी. देवरे, पी. एम. महाडीक.