ठाणगाव विद्यालयात विविध दाखल्यांचे महा राजस्व अभियानांतर्गत झाले वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 05:45 PM2020-01-02T17:45:24+5:302020-01-02T17:46:33+5:30

पाटोदा : ठाणगाव येथील राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे मंडळ अधिकारी रमेश खैरे व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे हे होते.

Distribution of certificates under Thanegaon Vidyalaya under Maha Revenue Campaign | ठाणगाव विद्यालयात विविध दाखल्यांचे महा राजस्व अभियानांतर्गत झाले वितरण

ठाणगाव येथील राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयात दाखले वितरण प्रसंगी रमेश खैरे, अर्जुन कोकाटे, कारभारी नवले, सविता शेळके, कानिफनाथ मढवई, संपत शेळके आदी.

Next

पाटोदा : ठाणगाव येथील राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे मंडळ अधिकारी रमेश खैरे व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे हे होते.
यावेळी मंडळ अधिकारी रमेश खैरे यांनी राजस्व अभियाना बाबत तसेच शासनाच्या महसूल विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती देऊन या राजस्व अभियानाचा तसेच योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, तलाठी अतुल थूल, संदीप काकड, सरपंच सविता शेळके, पोलीस पाटील राहुल शेळके, कृषी अधिकारी जनार्दन क्षीरसागर, धनंजय सोनावणे, रंजना मडके, सविता शिरसाठ, संपत शेळके, गोरख घुसळे, विठ्ठल वाळके, नाना शेळके, फकीरा शेळके, विष्णू कोंढरे, भाऊसाहेब शेळके, गोपीनाथ बुवा, जनार्दन भवर, गणपत भवर, महेंद्र दोडे, सतीश शेजवळ, कानिफनाथ मढवई, राजेंद्र बारे, भाऊसाहेब पुरकर, शिवाजी साताळकर आदी उपस्थित होते.
शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी हा उपक्र म राबविला जात असून योग्य मार्गदर्शनाअभावी नागरिकांना शासनाच्या योजनांपासून वंचित रहावे लागते. तसेच शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखले मिळविण्यासाठी धावपळ करावी लागते. यातून विद्यार्थी तसेच पालकांचा वेळ व पैसा वाया जातो. एवढे करूनही दाखले वेळेवर मिळत नसल्याने पालकांची धावपळ होते. तर कधीकधी विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होते. हि बाब लक्षात घेऊन तालुक्यातील प्रत्येक शाळेवर तसेच गावोगावी शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे वय अधिवास, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, नॉन क्रिमीलेअर आदी दाखले तत्काळ वितरण करण्यात येत असल्याने विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: Distribution of certificates under Thanegaon Vidyalaya under Maha Revenue Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.