शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

समग्र शिक्षांतर्गत पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:55 IST

समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप सुरू झाले आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येत असले तरी यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १५ जूनला शैक्षणिक वर्षा सुरु होऊनही शाळांपर्यंत पुस्तके पोहोचू शकली नव्हती.

ठळक मुद्देसमग्र शिक्षांतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना फिजिकल डिस्टंन्सचे पालन करून पुस्तकांचे वितरण

नाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येत असले तरी यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १५ जूनला शैक्षणिक वर्षा सुरु होऊनही शाळांपर्यंत पुस्तके पोहोचू शकली नव्हती. ही पुस्तके आता अखेर शाळांपर्यंत पोहोचली असून शाळास्तरावरून विद्यार्थ्यांनाही पुस्तकांचे वाटप सुरू झाले आहे. बहूतांश शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून पुस्तक वाटप सुरू केले असले तरी काही शाळांमधील विद्यार्थ्यांना पालक रोजगाराच्या शोधात घराबाहेर पडत असल्याने स्वत:च शाळेत जाऊन पुस्तके घ्यावी लागत असल्याचे दिसून येत आहे.  यावर्षी  १५ जूनपासून पासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. परंतू ,कोरोनाच्या संकटामुळे कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना बोलविण्यात आलले नाही, परंतु शासनाकडून  ज्या ठिकणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शहरातील केंद्र शाळांनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष शाळास्तरावरही पुस्तकांचे वितरण पूर्ण केले असून संबधित शाळांमधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करून  आणि फिजिकल डिस्टंन्सचे पालन करून पुस्तकांचे वाटप सुरू केले आहे.  नाशिक महापालिका क्षेत्रात शिक्षण विभागाचे दोन भाग असून, यातील नाशिक शहर व परिसर भाग एकमध्ये तर नाशिकरोड व सिडको भाग दोनमध्ये आहे. या दोन्ही भागांमध्ये पुस्तकांसाठी दोन स्वतंत्र भांडार असून शहर परिसरात गायकवाडनगर येथील शाळा क्रमांक ३४ येथील भांडारातून पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. तर नाशिकरोड व सिडको भागासाठी जेतवननगर येथीळ शाळा क्रमांक ५५ येथील भांडारातून पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही भांडारांच्या महापालिकेच्या व खासगी अनुदानित अशा मिळून सुमारे १७२ शाळांना २४  केंद्रांच्या माध्यमातून पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. परंतु, यावर्षी भाग दोन मध्ये मराठी माध्यामाच्या शाळांमध्ये एकात्मिक पाठ्यपुस्तक  पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून संबधित पुस्तकांची अजूनही शाळांना प्रतिक्षा आहे.  हीच स्थिची एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत येणाºया  मालेगाव व निफाड तालुक्यांतही असून संबधित शाळांना अजूनही काही काळ या पुस्तक ांची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी