वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्सेनिक अल्बम ३० या औषधाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:56 IST2020-05-30T22:48:20+5:302020-05-30T23:56:32+5:30
वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे कोरोनासारख्या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी येथील प्रसिद्ध उद्योजक मारुती कुलकर्णी व डॉ. विवेक सोनवणे यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या औषधांचे वाटप केले.

सिन्नर येथे वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्सेनिक अल्बम ३० या औषधाचे वाटप करताना उद्योजक मारुती कुलकर्णी.
सिन्नर : शहरासह तालुक्यातील गावांमध्ये वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे कोरोनासारख्या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी येथील प्रसिद्ध उद्योजक मारुती कुलकर्णी व डॉ. विवेक सोनवणे यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या औषधांचे वाटप केले.
भल्या पहाटे नित्यनियमाने वृत्तपत्राच्या प्रती ग्राहकांना पोहोच करणारा विक्रेता अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करत असतो. त्यांच्या आरोग्यासाठी माळेगाव येथील उद्योजक मारुती कुलकर्णी व सिन्नर येथील डॉ.विवेक सोनवणे यांनी विक्रेत्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचवलेले आर्सेनिक अल्बम
३० या औषधाचे प्रातिनिधिक स्वरूपात मनोज खैरे, अशोक उकाडे, गोरख दळवी, नितीन सोनवणे, सुरेश कपिले यांना वाटप करण्यात आले.