आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारांचे वितरण

By Admin | Updated: December 28, 2015 00:37 IST2015-12-28T00:27:38+5:302015-12-28T00:37:50+5:30

मेळावा : निकम बाबा स्मृती पुरस्कार अहेर यांना प्रदान

Distribution of Adarsh ​​Gram Panchayat Award | आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारांचे वितरण

आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारांचे वितरण

नाशिक : ग्रामसेवक युनियनने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा केलेला सन्मान अभिमानास्पद आहे. गावगाड्याचे काम करणारे कर्मचारी हा शासनाचा महत्त्वाचा घटक आहे. या कर्मचाऱ्यांचे स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी दिले.
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाचा जिल्हा मेळावा तिकडे कॉलनीतील कर्मचारी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नामदेव चव्हाण होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना चव्हाण म्हणाले, ग्रामसेवक युनियनने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सत्कार करून आदर्श निर्माण केला आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ग्रॅज्युएटीची ५०, हजारांची मर्यादेची अट रद्द करण्याचे आश्वासन दिल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले. राजू देसले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कॉ. राजाराम बाबा निकम स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा पुरस्कार देवळा येथील सुधाकर अहेर यांना प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक सखाराम दुरगुडे यांनी केले. तर उज्ज्वल गांगुर्डे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Distribution of Adarsh ​​Gram Panchayat Award