शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

राज्यात ६५ लाख ८० हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:15 AM

राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून १ ते २५ मेपर्यंत राज्यातील १ कोटी ४४ लाख ७५ हजार ७३५ शिधापत्रिकाधारकांना ६५ लाख ८० हजार ३३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच २७ लाख २८ हजार ५०२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिक : राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून १ ते २५ मेपर्यंत राज्यातील १ कोटी ४४ लाख ७५ हजार ७३५ शिधापत्रिकाधारकांना ६५ लाख ८० हजार ३३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच २७ लाख २८ हजार ५०२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. या योजनेमधून सुमारे १९ लाख ७७ हजार १९१ क्विंटल गहू, १५ लाख १८ हजार ९२५ क्विंटल तांदूळ, तर २१ हजार ९८ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ३ लाख ९९ हजार ५७९ शिधा पत्रिकाधारकांनी आॅनलाइन पद्धतीने धान्य घेतले आहे.४ मेपासून एकूण १ कोटी ३ लाख ७१ हजार ८२५ रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप केले आहे. राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४हजार ७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून या २ महिन्यासाठी प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने ( गहू ८ रु पये प्रति किलो व तांदूळ १२ रु पये प्रतिकिलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.२४ एप्रिलपासून सुरू होऊन आतापर्यंत ७ लाख ५३ हजार ८१० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रतिरेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ५१ हजार ७९८ क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.राज्यात २५ मेपर्यंत ८२२ शिवभोजन केंद्रातून पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे २७ लाख २८ हजार ५०२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारChhagan Bhujbalछगन भुजबळ