नांदगावी ३१ हजार वृक्षांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST2021-06-20T04:11:46+5:302021-06-20T04:11:46+5:30
: स्व. रंगनाथ हरी दौंड फाउंडेशन व जय सेवालाल फ्रेंड सर्कल मोकेश्वरनगर न्यायडोंगरी यांच्या संयुक्त विद्यमाने ३१००० ...

नांदगावी ३१ हजार वृक्षांचे वाटप
: स्व. रंगनाथ हरी दौंड फाउंडेशन व जय सेवालाल फ्रेंड सर्कल मोकेश्वरनगर न्यायडोंगरी यांच्या संयुक्त विद्यमाने ३१००० वृक्ष वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल कातकडे, प्रवीण दौंड, सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य. जय सेवालाल फ्रेंड सर्कल सदस्य व आरोग्य अधिकारी काटे आदी उपस्थित होते.
----------------------------
शासकीय योजनेचा दोनदा लाभ घेतल्याची तक्रार
नांदगाव
: फुलेनगरच्या ग्रामपंचायत सदस्याने स्वत:च्या कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावे शासकीय योजनेचा दोन वेळा लाभ घेतल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांचेकडे अमोल जेजूरकर यांनी केली आहे.
फुलेनगर येथील ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा लक्ष्मण खैरनार यांनी पुतण्या श्रीकांत खैरनार व दीर केशव खैरनार यांच्या नावे स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या योजनेतील शौचालयाच्या अनुदानाचा लाभ मिळवून दिला. केशव खैरनार दीर या एकाच व्यक्तीच्या नावे दोन वेळेस अनुदान मिळवून दिले. याप्रकारे पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी दोषींची चौकशी करून अहवाल मिळावा, असे अर्जात नमूद केले आहे.